तपोवन वाचवा मोहिमेसंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतल तपोवनचे जतन, परिसरातील जैवविविधतेचे रक्षण व स्थानिकांच्या सहभागातून मोहीम अधिक व्यापक करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
आयुक्तांचा प्रश्न : झाडे तोडायची नाही, मग साधुग्राम कुठे करायचे ?
कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार, ही मनपा प्रशासनाची भूमिका ठाम आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींचा या भूमिकेला विरोध आहे. तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ८) पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली असून झाडे तोडायची नाही, मग साधुग्राम कुठे करायचे? असा प्रश्न आयुक्त मनीषा खत्री यांनी उपस्थित केल्याने प्रशासनची हतबलता दिसून आली.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' म्हणत वारकरी, समाज चळवळच्या अभ्यासासाठी विद्यार्थीही रमले तपोवनात
नैसर्गिक तपोवनच राहू द्या, सिमेंटचे जंगल नका निर्माण करू
पर्यावरणप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया : विकास करत असताना नैसर्गिक साधनांचे जतन व रक्षण होणे आवश्यकच
तपोवनात पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी
तपोवनात पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी
तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात शहरातील तिन्ही आमदार अजून गप्प का?
तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात शहरातील तिन्ही आमदार अजून गप्प का?
वृक्षतोड रोखण्यासाठी 'मानवी साखळी'
पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तपोवनातील वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवत झाडांचे संरक्षण करण्यासाठी मानवी साखळी तयार केली. या उपक्रमात लहान मुले, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.